Tuesday, June 15, 2010

आई आता खूप हट्टी झालीय .....

लहानपणी आई चालताना हात धरून ठेवायची
पायात बळ आणि मनाचा संतुलन नव्हतं
मग पायात बळ आला हात सोडून धावण्याच
आईला कौतुक वाटायचा आणि काळजी हि!!!

मन खूप भरारी घ्यायचं संतुलन अजूनही नव्हतं
आई कधी हात उगारयाची, कालजीत्ल्या रागाने
ते फटके फार जोरात असायचे, हट्टी होतो खूप.....
मला खूप राग यायचा पण मी तरी कुठे गुणी होतो!

थोडा संतुलन वाढला आणि सुरु झाली आयुष्याची झुंझ !!!
इच्छाशक्ती खूप होती पण छाती थोडा बळ कमीच होतं
आता आई हात नाही उगरायची फक्त पाठीवर ठेवायची
कधी लढ म्हनाची तर कधी थोडा हळू जा.....

आता छातीत बळ हि आहे आणि इच्छाशक्ती
कामाची त्रस्ती असते तर कधी यशाची धुंदी
बरेच दिवस आईशी बोलणं होत नाही,
रात्री नेहमी ताट झाकून ठेवलेला असतं

आई आता थकली आहे पण नेहमी हसरा चेहरे असतो
पायातला बळ कमी कमी होत चालला आहे.
पण कोणाची मदत घ्याला तिला आवडत नाही.
मला पण नको म्हणते, आई आता खूप हट्टी झालीय .....

Copyright © 2010 निलेश सातपुते

2 comments:

  1. खरच आई अश्याच असतात !!!
    one man army!!
    simply cute post!!!

    ReplyDelete
  2. Awesome. Never knew this side of urs��
    आई
    तुझ्या कुशीत तुझ्या मिठीत असच आम्हाला आजन्म ठेव
    देवळात भले जाता नसू पण तुझ्यात कायमच दिसतो देव

    ReplyDelete