Sunday, April 4, 2010

Aahe haa sagla aakdyancha khel !

लहानपणी घरासमोरचा बंगला खूप आवडायचा.
आई म्हणायची एकदिवस नक्की घेऊ हा बंगला!
बाबांचा पगार तेव्हा ५ आकडी होता!
बंगल्याची किंमत तेव्हा ६ आकडी होती.

मी पुढे शिकलो engineer झालो .
Software कंपनी मध्ये नोकरी लागली.
माझा पगार तेव्हा ६ आकडी होता!
पण बंगल्याची किंमत तेव्हा ७ आकडी होती .

मी पुन्हा पुढे शिकलो MBA झालो .
पुन्हा Software कंपनी मध्ये नोकरी लागली.
आता माझा पगार ७ आकडी आहे !
पण आता बंगल्याची किंमत ८ आकडी आहे .

असा वाटता देव नेहमी एक आकडा कमीच देत राहिला.
आई म्हणते जे आहे त्यात सुखी राहूया!
बाबा म्हणतात जे नशिबात आहे तेच मिळेल.
भाऊ म्हणतो जे ताटात वाढला आहे ते गप खा आधी !

आयुष्य म्हणताय, माझ्याकडे आहेत सगळे आकडे,
हिम्मत असेल तर जा घेऊन !!!Copyright © 2010 निलेश सातपुते

No comments:

Post a Comment