Friday, April 9, 2010

कार्ड स्वाप करा आणि घ्या हवे तेवढे पैसे !!

रिक्षा वाला Rs5 जेव्हा जास्त मागतो, किती राग येतो!
Branded Show room मध्ये अवास्तव भाव असूनही आम्ही शांत राहतो!
तिथे AC च्या हवेत आमचा डोकं शांत राहता मग वाद कसा घालणार.


रिक्षा मध्ये fan लावून आमच डोकं त्याने शांत केला तर?
आम्ही त्या रिक्षा मध्ये बसणारच नाही..
साला fan चे extra पैसे लावेल म्हणून.


रिक्षा मध्ये आपण आकडेच फसतो आहोत असा वाटत,
आणि म्हणूनच खप जास्त राग येतो...
तसा Rs5 काही फार मोठी amount नाही, वडापाव तरी येतो का आता पाचला?


Branded Show room मध्ये आपल्यासमोर भरपूर लोक असतात.
ते सुधा देत आहेत न जास्त पैसे, आपण एकतेच फसत नाही आहोत.
आणि भाव करून आपण odd man out वाटू लोकांना..


AC च्या cool हवेत It does not लूक cool to bargain !!!


श्रीमंत, श्रीमंत होत जाणार आणी गरीब गरीबच राहणार!
आम्ही मध्यम वर्गीय गरीबाशी पाच रुपयासाठी वाद घालणार,
आणि श्रीमंताला खुशाल क्रेडीट कार्ड देणार, कार्ड स्वाप करा आणि घ्या हवे तेवढे पैसे!!
Copyright © 2010 निलेश सातपुते

Sunday, April 4, 2010

Aahe haa sagla aakdyancha khel !

लहानपणी घरासमोरचा बंगला खूप आवडायचा.
आई म्हणायची एकदिवस नक्की घेऊ हा बंगला!
बाबांचा पगार तेव्हा ५ आकडी होता!
बंगल्याची किंमत तेव्हा ६ आकडी होती.

मी पुढे शिकलो engineer झालो .
Software कंपनी मध्ये नोकरी लागली.
माझा पगार तेव्हा ६ आकडी होता!
पण बंगल्याची किंमत तेव्हा ७ आकडी होती .

मी पुन्हा पुढे शिकलो MBA झालो .
पुन्हा Software कंपनी मध्ये नोकरी लागली.
आता माझा पगार ७ आकडी आहे !
पण आता बंगल्याची किंमत ८ आकडी आहे .

असा वाटता देव नेहमी एक आकडा कमीच देत राहिला.
आई म्हणते जे आहे त्यात सुखी राहूया!
बाबा म्हणतात जे नशिबात आहे तेच मिळेल.
भाऊ म्हणतो जे ताटात वाढला आहे ते गप खा आधी !

आयुष्य म्हणताय, माझ्याकडे आहेत सगळे आकडे,
हिम्मत असेल तर जा घेऊन !!!Copyright © 2010 निलेश सातपुते